esakal | राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; इतर पर्यायांचा वापर करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; इतर पर्यायांचा वापर करण्याची मागणी

गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी लॉकडाउनच्या अचानक घोषणेचा सर्वाधिक फटका देशातील गोरगरीब जनतेला बसल्याचे म्हटले आहे. 

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; इतर पर्यायांचा वापर करण्याची मागणी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अचानक संपूर्ण टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी लॉकडाउनच्या अचानक घोषणेचा सर्वाधिक फटका देशातील गोरगरीब जनतेला बसल्याचे म्हटले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही विकसित देशांनी लॉकडाउनची घोषणा केली, मात्र भारताने त्यांचाच कित्ता न गिरविता इतरही पर्यायांचा वापर करावा, असेही गांधी यांनी नमूद केले आहे. 

इतर विकसित देशांसारखी भारतातील परिस्थिती नाही. ती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे काही मोठ्या देशांनी राबविलेल्या लॉकडाउनच्या धोरणाचे भारताने अनुकरण न करता इतर पर्यायांचा अवलंब करावा, असे गांधी यांनी म्हटले आहे. 
Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास

दररोज मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या गरीब कुटुंबांची संख्या भारतात प्रचंड मोठी आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व आर्थिक घडामोडी एकतर्फी बंद केल्यामुळे रोजंदारीवर अवलंबून असलेल्या गरीब नागरिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी, संपूर्ण आर्थिक टाळेबंदीमुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत प्रचंड वाढ होऊ शकते, असे गांधी यांनी म्हटले आहे. 

लॉकडाउनच्या अचानक करण्यात आलेल्या घोषणेमुळे देशात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हजारो स्थलांतरित कामगार आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धोकादायक मार्गांचा अवलंब करू लागले आहेत. रोजंदारी बंद झाल्याने मजूर वर्ग सैरभैर झाला असून, त्यांना पोषणमूल्ये आणि मूलभूत सेवांपासून वंचित राहावे लागणार आहे, असे गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

loading image