esakal | 1921 नंबरच्या कॉलवरून विचारले जाणार पुढील प्रश्न...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus goverment will be conducting telephonic survey

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता टेलीफोनिक सर्वेक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९२१ या क्रमांकावरुन देशभरातील जनतेला कॉल करुन कोरोनाच्या लक्षणाबाबतची माहिती विचारली जाणार आहे.

1921 नंबरच्या कॉलवरून विचारले जाणार पुढील प्रश्न...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता टेलीफोनिक सर्वेक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९२१ या क्रमांकावरुन देशभरातील जनतेला कॉल करुन कोरोनाच्या लक्षणाबाबतची माहिती विचारली जाणार आहे. जनतेने या सर्वेक्षणाद्वारे सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

...आणि तहसीलदारांच्या डोळ्यात टचकण पाणी आलं

सरकारने १९२१ या क्रमांकावरुन देशातील जनतेला कॉल करुन आरोग्यबाबतची माहिती विचारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून येणाऱ्या कॉलवर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि पत्ता विचारला जाईल. तुम्ही जर परदेशात प्रवास केला असेल तर या प्रवासाबद्दलची माहिती विचारली जाईल. शिवाय, तुमच्या कुटुंबातील सदस्याला किंवा तुमच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही असा प्रश्नही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विचारला जाणार आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून टेलीफोनिक सर्वेक्षण केले जाणार आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 984 वर पोहचली असून, 640 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 तासांत देशभरात कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला असून 1383 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

loading image