esakal | ...आणि तहसीलदारांच्या डोळ्यात टचकण पाणी आलं
sakal

बोलून बातमी शोधा

son refuse father dead body because infection of corona at mp

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. पण, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईक तयार होत नाहीत. अशीच एक घटना येथे घडली आहे.

...आणि तहसीलदारांच्या डोळ्यात टचकण पाणी आलं

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश) : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. पण, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईक तयार होत नाहीत. अशीच एक घटना येथे घडली आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपल्यालाही तो होईल या भीतीने मुलाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. दोन दिवस मृतदेह तसाच पडून होता. अखेर, तहसिलदारांनी मुलाला विनंती केली. त्या विनंतीनंतर मुलाने लिहून दिले की, मला किट घालता येत नाही आणि काढताही येत नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्काराबद्दलची माहिती नाही. मी माझ्या वडिलांचा मृतदेह प्रशासनाकडे सोपवत आहे. त्यांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत. मुलाचे पत्र वाचून तहसीलदार गुलाब सिंग बघेल यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मुलगा म्हणून त्या व्यक्तीवर अंत्यंसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि विधीवत अंत्यसंस्कार केले. या घटनेची राज्याच चर्चा सुरू आहे.

एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोना अन्...

दरम्यान, कोरोनाने आतापर्यंत जगात 1 लाख 60 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका स्पेन, इटली आणि अमेरिकेला बसला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

लॉकडाऊनमुळे चिमुकली 100 किमी चालली अन्...

loading image
go to top