esakal | सर्वांत स्वस्त टेस्टिंग किट आता भारतात
sakal

बोलून बातमी शोधा

Testing-Kit

अवघ्या ५०० रुपये किमतीत उपलब्ध होऊ शकणारे टेस्टिंग किट तयार करण्यात येथील खासगी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या विषाणूचे तातडीने निदान करणे या टेस्टिंग किटमुळे शक्य होणार आहे.

सर्वांत स्वस्त टेस्टिंग किट आता भारतात

sakal_logo
By
श्‍यामल रॉय

कोलकाता - अवघ्या ५०० रुपये किमतीत उपलब्ध होऊ शकणारे टेस्टिंग किट तयार करण्यात येथील खासगी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या विषाणूचे तातडीने निदान करणे या टेस्टिंग किटमुळे शक्य होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेगाने निष्कर्ष उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या या टेस्टिंग किटवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) शिक्कामोर्तब केले आहे. या टेस्टिंग किटद्वारे अवघ्या ९० मिनिटांमध्ये निष्कर्ष मिळू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. कोरोनाच्या विषाणूची रचना सातत्याने बदलत असली तरी या टेस्टिंग किटद्वारे तो शोधता येणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 
कोलकत्यातील खासगी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी हे किट विकसित केले आहे. त्यासाठी सीएसआयआरचे समीत अद्या आणि कोलकता विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख कौस्तव पोंदुआ यांचे सहकार्य लाभले आहे. 

असे आहे टेस्टिंग किट... 
- स्थानिक साहित्याचा वापर केल्याने ५०० रुपयांत निर्मिती शक्य 
- ९० मिनिटांमध्ये कोरोनाच्या विषाणूचे निदान करता येणार 
- आसीएमआरकडून हिरवा कंदील 
- विषाणूची बदलती रचना ओळखणे शक्य 
- पश्चिम बंगाल सरकारच्या जैवतंत्रज्ञान पार्कमधील प्रयोगशाळेकडून निर्मिती

loading image