ही बातमी आशेचा किरण; भारतात कोरोनाच्या औषधाच्या चाचण्या सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus India vaccine testing updates solidarity mission

आयसीएमआर आणि राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेच्या (नारी) वतीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

ही बातमी आशेचा किरण; भारतात कोरोनाच्या औषधाच्या चाचण्या सुरू

पुणे Pune News : कोरोनावरील उपचारासाठी जगभरात विविध औषधांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहे. देशातही निवडक औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने "सॉलिडॅरिटी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. लवकरात लवकर कोविड-19च्या उपचारासाठी सुरक्षीत आणि विश्वासार्ह औषध उपलब्ध होण्यासाठी ही मोहिम महत्वपुर्ण ठरणार आहे. 

आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल

भारतीय वैद्यक संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) माध्यमातून देशातील सॉलिडॅरिटी मोहीमेची तीव्रता वाढविणार असल्याचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. देशातील विविध भागात होणाऱ्या परिक्षणासाठी आयसीएमआर आणि राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेच्या (नारी) वतीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी रुग्णांची निवड करण्याचे कामही चालू आहे. सॉलिडॅरिटी मोहीमेअंतर्गत जलद चाचणी होऊन कोरोनाच्या उपचारासाठी औषध वेळेत उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा जगभरात व्यक्त होत आहे. 

आणखी वाचा - पुण्याच्या रेडी झोनमध्ये आता धारावी पॅटर्न

काय आहे सॉलिडॅरिटी मोहीम?

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने जगभरात वैद्यकीय चाचण्यांसाठी या मोहिमेची आखणी 
  • संसर्गजन्य आजारांसाठी प्रयोगशाळेबाहेरील फेज 3 आणि 4 मधील चाचण्यांसाठी उपयोग 
  • कोविड-19च्या उपचारासाठी औषधाच्या प्रभावी वैद्यकीय चाचण्यांसाठी वापर 
  • वेगवेगळी जीवनशैली आणि गुणसुत्रे असलेल्या लोकांवर एकाचवेळी चाचणी 
  • एकाच वेळी विविध औषधांच्या आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांच्या आधारे चाचणी शक्य  
  • वेळेची बचत तर होतेच पण त्याचबरोबर परिणामांची विश्वासार्हता वाढते 

आणखी वाचा - पुण्यात सरकारी कार्यालये सुरू होण्याचे संकेत

भारतात होणार या औषधांची चाचणी 

  • रेमेडिसिव्हर 
  • क्लोडरोक्विीन किंवा हायड्रोक्लोवरोक्विन 
  • लोपिनवीर-रिटोनविर 
  • इंटरफेरॉन (बिटा 1ए) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही आकडेवारी वाचा!

  • जगभरातील सहभागी देश - 100 
  • चाचणीत सहभागी देशातील रुग्ण - 1500 
  • चालू असलेल्या चाचण्या किंवा संशोधने - 144 
  • औषधाची प्रत्यक्ष वैद्यकीय चाचणी - 6 रुग्ण 
  • वैद्यकीय चाचणीपुर्व परिक्षणासाठी - 77 रुग्ण 
  • सॉलिडॅरिटी मोहिमेसाठी आर्थिक पाठबळ पुरविणारे देश - 45 

भारतात कोरोनाच्या उपचारासाठी प्रभावी औषध शोधण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी आयसीएमआरच्या वतीने जास्त रुग्णसंख्या असलेल्या भागातील रुग्णांची निवड करण्याचे काम चालू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने यासाठी भारताला आवश्यीक ती सर्व मदत पुरविण्यात येत आहे.
- डॉ. शिला गोडबोले, देशातील सॉलिडॅरिटी मोहिमेच्या संयोजक

टॅग्स :Baramati