Coronavirus India Updates : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय, पण...

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 14 August 2020

महाराष्ट्रातील कोराना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर, इथं आता शहरांसह खेड्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

नवी दिल्ली भारतात  मागील 24 तासांत कोरोनाच्या रुग्णांचा(corona) आकडा  65 हजार 553 ने वाढून 1007 लोकांचा मृत्यु झाला आहे. यामुळे भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 24 लाखांच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशातील बाधितांचा आकडा 24,61,190 झाला असून 48,040 लोकांना प्राण गमवावा लागले आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,  कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (recovery rate) सुधारलं असून ते 70.77 टक्के झाले आहे, जी एक दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत देशात 17 लाख जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनानं मृत्यु (corona fatality rate) होण्याचं प्रमाणही 1.96 टक्क्यानं कमी झालं आहे. सध्या आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधील वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा चिंता वाढवणारा ठरत आहे. इकडे बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि आसाममध्येही कोरोना जुलै महिन्यापासून मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. 

रशियाच्या कोरोना लशीची भारतात चाचणी नाहीच; डोस मिळणार की नाही?

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती-

महाराष्ट्रातील कोराना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर, इथं आता शहरांसह खेड्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाची 11,813 नवे रुग्ण आढळले असून 413 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 5,60,126 कोरोनाचे रुग्ण दिसून आले आहेत ,तसेच मृतांची संख्या 19,064 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत 9,115 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 1,49,798 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 3,90,948 रुग्ण बरे झाले आहेत आणि 27,76,090 लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. 

आणखी वाचा - शरद पवार म्हणाले, काळजी करू नका; मी तुमच्या पाठिशी

जगातील परिस्थिती (global corona conditions) पाहिली तर, आतापर्यंत जगभरातील कोरोना झालेल्यांचा आकडा 2 कोटीच्या वर गेला आहे. सध्या अमेरिकेत सगळ्यात जास्त रुग्ण असून त्यानंतर ब्राझील आणि भारत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus India Updates Over 2.4 million cases UP claims to be no 1 in testing