भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतोय पण...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

आत्तापर्यंत 26 लाखांहून अधिक चाचण्या

- अधिक रेल्वेगाड्या सोडल्या जाणार

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे अनेक पर्याय वापरले जात आहेत. मात्र, तरीदेखील देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. हा एक चिंतेचा विषय बनत आहे. तसेच आता भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 1,12,442 वर गेला आहे. पण यातील विशेष बाब म्हणजे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 45,422 रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4.0 ची घोषणा देशात केली. पण यामध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार अनेक सेवांमध्ये सूट दिली जात आहे. पण दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या 1,12,442 झाली आहे. वर्ल्डोमीटर्सनुसार सध्या देशात 63,582 कोरोनाचे ऍक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे 45,422 रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Corona Image, Source : Zee

आत्तापर्यंत 26 लाखांहून अधिक चाचण्या

देशात वाढत चाललेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हा एक चिंतेचा विषय बनत आहे. परंतु, प्रशासनाकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. आत्तापर्यंत 26,15,920 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सध्या 63,582 ऍक्टिव्ह केसेस आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिक रेल्वेगाड्या सोडल्या जाणार

कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास भारताला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे आपल्या घरापासून इतर ठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी अधिक रेल्वेगाड्या सोडण्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली. 

चंद्रपूरात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी 9 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये मालेगावच्या इंडस्ट्रिअल भागातून आलेले कामगार आहेत. ते चंद्रपूर येथे परतले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Patients Increases in India Now 112442 Patients