esakal | Coronavirus : कनिका दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह!

बोलून बातमी शोधा

Kanika Kapoor

कनिकाच्या पहिल्या रिपोर्टमध्ये काही चुका आढळून आल्या होत्या. तिचे वय २८ वर्षे तर लिंग पुरूष दाखविण्यात आले होते, त्यामुळे तिच्या घरच्यांनी या रिपोर्टवर शंका उपस्थित केली होती व दुसऱ्यांदा चाचणी करण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये कनिकाच्या शरिरात कोरोना व्हायरसचा हाय डोस आढळला आहे. 

Coronavirus : कनिका दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घेतले असून सर्वच देशांनी योग्य ते खबरदारीचे उपाय योजले आहेत. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत कोणालाचा या कोरोनाने सोडले नाही. भारतातील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टच्या रिपोर्टनुसार तिची दुसरी टेस्टही कोरोना झिटीव्ह निघाल्याची माहिती समोर आली आहे. 

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या पहिल्या रिपोर्टवर तिच्या कुटूंबियांनी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे तिची दुसऱ्यांदा कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणीही कोरोना पॉझिटीव्ह आल्याने तिला कोरोनाची लागण झाल्याची खात्री पटली आहे. रविवारी कनिकाची दुसरी चाचणी करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

कनिकाच्या पहिल्या रिपोर्टमध्ये काही चुका आढळून आल्या होत्या. तिचे वय २८ वर्षे तर लिंग पुरूष दाखविण्यात आले होते, त्यामुळे तिच्या घरच्यांनी या रिपोर्टवर शंका उपस्थित केली होती व दुसऱ्यांदा चाचणी करण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये कनिकाच्या शरिरात कोरोना व्हायरसचा हाय डोस आढळला आहे. 

दरम्यान, कनिका ज्या २६६ लोकांच्या संपर्कात आली होती, त्यांचा शोध घेणे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ती इंग्लंडहून परतली होती व एका पार्टीत ती सहभागी झाली होती. तर तिने कोरोना झाल्याचे लपवून ठेवले होते असा आरोप तिच्यावर केला जात आहे.