Video: केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केली वडिलांची दाढी

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

कोरोना व्हायरसमुळे अनेक सेवा बंद आहेत, यामध्ये कशकर्तनालायाचाही समावेश आहे. लॉकडाऊनचा काळ मोठा असल्यामुळे अनेकांच्या केसांची व दाढीची समस्या निर्माण झाली आहे. यावर अनेकजण उपाय करताना दिसतात. मात्र, एका केंद्रीय मंत्र्याची दाढी त्यांच्या मुलाने केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे अनेक सेवा बंद आहेत, यामध्ये कशकर्तनालायाचाही समावेश आहे. लॉकडाऊनचा काळ मोठा असल्यामुळे अनेकांच्या केसांची व दाढीची समस्या निर्माण झाली आहे. यावर अनेकजण उपाय करताना दिसतात. मात्र, एका केंद्रीय मंत्र्याची दाढी त्यांच्या मुलाने केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?'

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची दाढी त्याचा मुलला चिराग पास्वाने केली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यामातून मुलाचे कौतुक केले आहे. चिराग पास्वान यांनी व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करताना म्हटले आहे की, 'काळ कठीण आहे. मात्र यातही एक उजेडाची बाब आहे. आपण इतरांची दाढी करू शकतो, याचे कौशल्य आपल्याकडे असू शकते, याचा साक्षात्कार मला लॉकडाऊनच्या काळात झाला. यामुळे अनेक घटना स्मरणात राहतील.'

व्हिडिओमध्ये रामविलास पासवान आपल्या घरात एका खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्या अंगावर कपडा टाकून चिराग पास्वान इलेक्‍ट्रिक ट्रिमरच्या सहाय्याने दाढी कमी करीत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पंधरा दिवसापूर्वी जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दाढीसह प्रसारमाध्यमांसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी केशकर्तनालय ही जीवनावश्‍यक बाब समजली जावी असे ट्विट केले होते.

रस्त्यावरून आरामात गाडी चालवत होता अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown chirag paswan shaves dad ram vilas paswan's beard viral video