esakal | दुध विक्रेता लय भारी; फोटो व्हायरल...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown milk man delivers milk unique way photo goes viral

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. एका दुध विक्रेत्याने सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होवू नये म्हणून चांगली युक्ती केली आहे.

दुध विक्रेता लय भारी; फोटो व्हायरल...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. एका दुध विक्रेत्याने सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होवू नये म्हणून चांगली युक्ती केली आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॉकडाऊन नंतरही ऑफिस नको रे बाबा...

वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हे छायाचित्र व्हायरल केले आहे. छायाचित्र पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत असून, त्याच्या कल्पकतेचे अनेकांनी कौतुक केले आहे. कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होवू नये म्हणून विक्रेत्याने दुचाकीवर दुधाच्या कॅन लटकवले आहेत. दुचाकीच्या सीटवर एक पाईप लावला आहे. या पाईपद्वारे तो दूध विक्री करताना दिसतो. या पाईपमुळे दूध विक्रेता आणि ग्राहकामध्ये अंतर राहताना दिसते.

दरम्यान, दूध विक्रेत्याने लढवलेली युक्ती पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. लॉकडाऊनदरम्यान प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. दुध विक्रेत्याने हे आपल्या कल्पक बुद्धीतून दाखवून दिले आहे. यामुळे दुध विक्री सुरू आहे आणि शल डिस्टंसिंगचे उल्लंघनही होत नाही.

कोट्यवधींची संपत्ती पण खांदाही कोणी देईना...

loading image
go to top