esakal | लॉकडाऊन नंतरही ऑफिस नको रे बाबा...
sakal

बोलून बातमी शोधा

93 percent indians are stressed about returning to office post lockdown says survey

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान विविध कंपन्यांनी घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा दिली. पण, लॉकडाऊन उठवल्यानंतरही ऑफिस सध्या तरी नकोच, अशी भूमिका कर्मचाऱयांनी घेतली आहे.

लॉकडाऊन नंतरही ऑफिस नको रे बाबा...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान विविध कंपन्यांनी घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा दिली. पण, लॉकडाऊन उठवल्यानंतरही ऑफिस सध्या तरी नकोच, अशी भूमिका कर्मचाऱयांनी घेतली आहे.

कोट्यवधींची संपत्ती पण खांदाही कोणी देईना...

'एफवायआय' या आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपनीने 'माइंड मॅप अ‍ॅडव्हान्स रिसर्च' या कंपनीकडून दिल्ली, मुंबई, बंगळूरमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मते एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली. देशभरातील 560 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 85 टक्के कर्मचारी पुरुष होते तर 15 टक्के महिला कर्मचारी होत्या. एफव्हाआय कंपनीने एप्रिल 2020 मध्ये हे सर्वेक्षण केले होते.

मुलगी पास झाली अभिनंदन! वडील म्हणाले, ती गेली हो...

सर्वेक्षणादरम्यान अनेकांनी ऑफिसला जायला भीती वाटत असल्याचे सांगितले. देशातील 93 टक्के कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन उठवल्यानंतरही ऑफिसला जाण्याची भीती वाटत आहे. 85 टक्के कर्मचाऱ्यांनी पुन्हा कार्यालय सुरू होण्याआधी ते पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे, असे मत व्यक्त केले आहे.

दागिन्यांनी सजलेल्या दुकानात दिसताहेत कांदे, बटाटे...

दरम्यान, देशभरात अद्यापही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. मात्र, विविध राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केला आहे. देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे.

loading image
go to top