esakal | कोट्यवधींची संपत्ती पण खांदाही कोणी देईना...
sakal

बोलून बातमी शोधा

businessman died from covid 19 lockdown at madhya pradesh

एका व्यावसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोट्यवधी रुपयांची संपत्ती ते मागे ठेवन गेले. पण, शेवटच्या क्षणी त्यांना खांदा द्यायलाही कोणी आले नाही. मुलांनी तर मोबाईलवरून अंत्यदर्शन घेतल्याची घटना येथे घडली.

कोट्यवधींची संपत्ती पण खांदाही कोणी देईना...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंदोर (मध्य प्रदेश): एका व्यावसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोट्यवधी रुपयांची संपत्ती ते मागे ठेवन गेले. पण, शेवटच्या क्षणी त्यांना खांदा द्यायलाही कोणी आले नाही. मुलांनी तर मोबाईलवरून अंत्यदर्शन घेतल्याची घटना येथे घडली.

दागिन्यांनी सजलेल्या दुकानात दिसताहेत कांदे, बटाटे...

इंदौर इथले प्रतिष्ठीत हॉटेल व्यवसायिकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पत्नी आणि आईवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या व्यवसायिकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती, नोकर आहेत. पण, शेवटच्या क्षणी एकहीजण स्मशानभूमीपर्यंत खांदा द्यायला येऊ शकला नाही. तर दोन्ही मुलांनी मोबाईलवरच वडिलांचे अंत्यदर्शन घेतले. व्यावसायिकाचे नातेवाईक विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

गर्भवती पत्नी; समोर चिमुकला अन्‌ दारूसाठी तडफड...

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 952 आहे. तर, आतापर्यंत 1783 जणांचा मृत्यू झाला आहे.

loading image
go to top