esakal | लॉकडाऊनच्या काळात 'ही' वस्तू झाली व्हायरल...

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown sudhakar yadav making car name corona photo viral on social media

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर एका अवलियाने कोरोनाच्या विषाणूसारखी मोटार तयार केली. संबंधित मोटार सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 'ही' वस्तू झाली व्हायरल...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर एका अवलियाने कोरोनाच्या विषाणूसारखी मोटार तयार केली. संबंधित मोटार सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हैदराबाद येथील सुधाकर यादव यांनी कोरोना व्हायरस नावाची एक खास मोटार डिझाइन केली आहे. मोटार डिझान करून त्यांनी नागरिकांना लॉकडाऊन आणि सरकारचे आदेश पाळण्याचे आवाहन करत आहे. संबंधित मोटार सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चर्चेत आली आहे. यापूर्वी कोरोनाच्या हेल्मेट व्हायरल झाले होते.

दुचाकीवर दुधाचे कॅन पाहून शंका आली अन्...

सुधाकर यादव यांनी 100 सीसी इंजिन असलेली ही मोटार तयार केली आहे. घराबाहेर जाणे टाळावे, जगभरातील साथीचा रोग टाळण्यासाठी घरातच राहावे म्हणून ते ही मोटार घेऊन घरोघरी जाऊन संदेश देतात. या मोटारीच्या माध्यमातून ते  नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहेत. या मोटारीचा आकार छोटा आहे. सी-सीटर कार प्लोरोसंट ग्रीन फायबरने बनवलेली आहे. व्हायरससारख्या दिसणाऱ्या स्पाइकसह ही कार हैदराबादच्या रस्त्यावरून फिरत आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्याविषयी वारंवार आठवण करून देत आहे. गेल्या पाच दशकांपासून ते अशा पद्धतीच्या विचित्र आकारांच्या गाड्या तयार करतात. लॉकडाऊन दरम्यान मोटार वापरण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना देणगी म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी त्यांनी बर्गर, क्रिकेट ब़ल संगणकाच्या आकाराच्या गाड्या तयार केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी घेणार मोठा निर्णय...