esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी घेणार मोठा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi to hold cm conference on 11 april lockdown coronavirus

देशातील कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, देशातील सर्व भागांमधून लॉकडाऊन उठविणे शक्य होणार नाही. लॉकडाऊन संदर्भांत पुढील मोठा निर्णय शनिवारी (ता. 11) घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी घेणार मोठा निर्णय...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, देशातील सर्व भागांमधून लॉकडाऊन उठविणे शक्य होणार नाही. लॉकडाऊन संदर्भांत पुढील मोठा निर्णय शनिवारी (ता. 11) घेणार आहेत.

मोदींनी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक घेतली होती. देशव्यापी लॉकडाउन सुरू व्हायच्या आधीही अशी बैठक झाली होती. देशातील 21 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना शनिवारी (ता. 11) पुन्हा एकदा राज्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. यानंतर लॉकडाऊन संदर्भात पुढील निर्णय घेणार आहेत.

पाकला काय म्हणावे; बातमी काय दिली पाहा...

पंतप्रधानांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज (बुधवार) सर्वपक्षीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. बैठकीवेळी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. लॉकडाऊननंतरही देशाततील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या परिस्थितीत लॉकडाऊन सरसकट उठवणे परवडण्यासारखे नाही, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत शनिवारी पुन्हा एकदा चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले जात आहे.

दुचाकीवर दुधाचे कॅन पाहून शंका आली अन्...