esakal | दुचाकीवर दुधाचे कॅन पाहून शंका आली अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

youth arrested for carrying liquor bottles in milk cans in delhi

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, तळीराम दारू मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून दारू मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना राजधानीत राष्ट्रपती भवनजवळ घडली असून, पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

दुचाकीवर दुधाचे कॅन पाहून शंका आली अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, तळीराम दारू मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून दारू मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना राजधानीत राष्ट्रपती भवनजवळ घडली असून, पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

तळीरामाने 'यूट्यूब' पाहून घरीच बनवली दारू; पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रेशन दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, मेडिकल अशा आवश्यक सेवा सोडल्या तर अन्य सर्व दुकाने बंद आहेत. दारुची दुकानेही बंद आहेत. दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची तडफड होऊ लागली आहे. तळीराम दारू मिळविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत.

Video: पत्नीचे सोशल डिस्टन्स म्हणजे सोशल डिस्टन्स...

दिल्लीमध्ये एक युवक रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवर दुधाचे कॅन घेऊन निघाला होता. पोलिसांनी त्याला राष्ट्रपती भवनजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने दुचाकीचा वेग वाढवला. अखेर त्याचा पाठलाग करुन राष्ट्रपती भवनजवळ रात्री १२.३० च्या सु्मारास ताब्यात घेतले. त्याच्याजवळील चार दुधाच्या कॅनमधून सात दारुच्या बाटल्या जप्त केल्या. चौकशीदरम्यान त्याने गुरूग्राम येथून दारु विकत घेतली सांगितले. पण परत जाताना रस्ता चुकल्याचे पोलिसांना सांगितले.

युवती म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आणि तो पसरवणार...

संबंधित युवकाचे नाव बॉबी चौधरी (रा. बुलंदशहर) आहे. चुलत भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्याने दारुच्या बाटल्या घेतल्या होत्या, असे चौकशीदरम्यान त्याने सांगितले. दरम्यान, लॉकडाउनमुळे दारुची दुकाने बंद असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत दारुच्या दुकानांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.