esakal | Video: सॅनिटाझरला समजले तीर्थ अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus man who takes sanitizers to drink sunil grover shared video

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जातो. एका व्यक्तीच्या हातावर सॅनिटायझर दिल्यानंतर त्यांना तीर्थ वाटले आणि पिण्याचा प्रयत्नात असताना उपस्थितांनी त्यांना रोखले. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: सॅनिटाझरला समजले तीर्थ अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जातो. एका व्यक्तीच्या हातावर सॅनिटायझर दिल्यानंतर त्यांना तीर्थ वाटले आणि पिण्याचा प्रयत्नात असताना उपस्थितांनी त्यांना रोखले. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

माझ्याशी असं बोलायची हिंमत कशी केलीस? चपलेने मारले...

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे. संबंधित व्हिडिओ प्रसिद्ध कॉमेडियन डॉ. सुनील ग्रोवरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना व्हायरसमुळे मास्क आणि सॅनिटाझर आता जीवनावश्यक वस्तू होऊ लागली असून, अनेकजण वापरताना दिसतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातावर सॅनिटायझर दिल्यानंतर त्यांना तीर्थ असल्याचे वाटले. तीर्थ समजून सॅनिटायझर तोंडात घेण्याआधी स्थानिकांनी त्यांना रोखले. तीर्थ नसून हे सॅनिटायझर असल्याचे सांगितले.

मासा घुसला शरीरात अन् झाली तडपड...

दरम्यान, ग्रोवर यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर लाखो नेटिझन्सनी पाहिला असन, प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. पण, हा व्हिडिओ भारतातील कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही.

loading image