esakal | Corona Update: 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; 1,206 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Corona Update: 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; 1,206 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. 35 हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 45 हजारांच्या पुढे गेली होती. आता यामध्ये पुन्हा एकदा थोड्याप्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

बुधवार आणि गुरुवारपेक्षा शुक्रवारी नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली आहे. मात्र मृताच्या संख्येत मात्र मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात 42 हजार 766 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 45 हजार 254 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 1206 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या तीन हजारांनी कमी झाली आहे.

हेही वाचा: ...तरच विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार - भास्कर जाधव

देशातील मृताची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. शुक्रावारी मृताची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे. नऊ दिवसानंतर कोरोना मृताची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे. याआधी 30 जून रोजी एक हजार 2 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात वाढलेल्या मृताच्या संख्येमुळे कोरोना मृताची संख्या वाढली आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 738 मृताची नोंद पाहायला मिळाली.

हेही वाचा: 'संजय राऊत सर्वज्ञ नाहीत; सहकार मंत्रालयावरील टीका चुकीची'

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण Total cases: 3,07,95,716

एकूण कोरोनामुक्त Total recoveries: 2,99,33,538

एकूण उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,55,033

एकूण मृत्यू Death toll: 4,07,145

कोरोनावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोदी सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. आतापर्यंत 37 कोटी 21लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 57 लाख 73 हजार 241 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 8 जुलै 2021 रोजी 3,18,143 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

loading image