esakal | Serosurvey: 67 टक्के भारतीयांमध्ये अँटीबॉडीज; 40 कोटी लोकांना अजूनही धोका
sakal

बोलून बातमी शोधा

67 टक्के भारतीयांमध्ये अँटीबॉडीज; 40 कोटी लोकांना अजूनही धोका

67 टक्के भारतीयांमध्ये अँटीबॉडीज; 40 कोटी लोकांना अजूनही धोका

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : चौथ्या नॅशनल सीरोसर्व्हेचे निष्कर्ष समोर आले आहेत. हा सर्व्हे जून-जुलैमध्ये 70 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 6-17 वर्षे वयोगटातील लहान मुलांना देखील सामील करण्यात आलं होतं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलंय की, आम्ही चौथा सीरोसर्व्हे केला आहे. हा सर्व्हे इतर सर्व्हेहून वेगळा आहे. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. (coronavirus serosurvey 40 crore population still vulnerable according to the sero survey)

हेही वाचा: "वेबसीरिज, शॉर्ट स्टोरीजच्या आमिषानं नवोदित अभिनेत्रींची फसवणूक"

तर एकूण लोकसंख्येच्या एक-तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज नाही आहेत. म्हणजेच 40 कोटी लोकांना अजूनही कोरोना आपला विळखा घालू शकतो. एकूण मिळून देशातील 67 टक्के लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या विरोधात अँटीबॉडीज बनल्या आहेत. 6-9 वर्षे वयाच्या लोकांमध्ये त्या 57.2 टक्के आहे, 10-17 वयोगटामध्ये त्या 61.6 टक्के आहे, 18-44 वयोगटामध्ये त्या 66.7 टक्के आहे आणि 45-60 वयोगटाच्या लोकांमध्ये त्या 77.6 टक्के आहे.

त्यांनी म्हटलंय की, विना अँटीबॉडीजच्या राज्यांमध्ये/जिल्ह्यांमध्ये/क्षेत्रांमध्ये कोरोना संक्रमणाच्या लाटेचा धोका अधिक आहे. अर्ध्याहून अधिक लहान मुले (6-17 वर्षे) सीरोपॉझिटीव्ह होते. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये सीरोचा प्रसार समान होता. 85 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाच्या विरोधातील अँटीबॉडीज तयार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दहाव्या भागाचं लसीकरण झालं नाहीये. आम्ही 7252 आरोग्य कर्मचाऱ्यांचं अध्ययन केलं आहे.

हेही वाचा: "जबाबदारी घेण्याऐवजी मोदींनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवलं"

डॉ. भार्गव यांनी म्हटलंय की, सीरोसर्व्हे आशेची किरण दाखवतो. मात्र, याचा अर्थ असा नाहीये की, आपण आपले प्रयत्न आता कमी केले पाहिजेत. सीरोसर्व्हे एकूण 28,975 लोकांवर केला गेला. 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे राबवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 10 गाव/ वार्डामध्ये तो केला गेला असून यामध्ये त्यामधील प्रत्येकी 40 व्यक्ती सामील झाले होते. सर्व्हेच्या निष्कर्षांचं आकलन केल्यानंतर सांगण्यात आलंय की, सामाजिक, धार्मिक, राजकीय निमित्ताने होणारी गर्दी टाळावी. अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच पूर्णपणे लसीकरण झाल्यानंतरच प्रवास करावा. लहान मुले विषाणू विरोधात अधिक चांगल्या पद्धतीने लढा देऊ शकतात. प्राथमिक शाळांना उघडण्याचा विचार सर्वांत आधी करणं विवेकाला धरुन असेल, असंही त्यांनी म्हटलंय.

loading image