नगरसेवक मॅनहोलमध्ये उतरले अन्...

वृत्तसंस्था
Thursday, 25 June 2020

मंगलोर येथील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ते चर्चेत आले आहेत. मनोहर शेट्टी असे त्या नगरसेवकाचे नाव आहे.

बंगळुरु (कर्नाटक): मंगलोर येथील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ते चर्चेत आले आहेत. मनोहर शेट्टी असे त्या नगरसेवकाचे नाव आहे.

ग्रामस्थांनी 'हात' धुतल्यावर टाकल्या अक्षता...

शेट्टी हे मॅनहोलमध्ये उतरत असतानाचे छायाचित्र व्हायरल होत असून, नगरसेवक कसा असावा याबाबतच्या प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेट्टींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेट्टी म्हणाले, 'माझ्या भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. गटारामधून ते जात नव्हते. त्यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता, त्याचबरोबर रहदारीही अतिशय संथ गतीने सुरू होती. मजुरांना हे काम करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला. पावसाळ्यात गटाराच्या आत जाणे धोकादायक असल्याचे कामगारांनी सांगितले. यानंतर त्यांनी मशीन बसवून पाणी काढण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्नही अपयशी ठरला. यामुळे मी स्वतः मॅनहोल साफ करण्याचा विचार केला. मला त्या मॅनहोलमध्ये प्रवेश करताना पाहून माझ्या पक्षाचे अन्य चार आले. मग आम्ही फ्लॅशलाइटच्या मदतीने पाइपलाइन स्वच्छ केली. आम्हाला अर्धा दिवस लागला. पण, पाईपलाईन साफ ​​झाल्यानंतर रस्त्यावर साचलेले पाणी वाहून गेले.'

पाकिस्तानातील 40 टक्के वैमानिक बनावट...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporator manohar shetty himself went inside the manhole for cleaning at mangalore