esakal | ग्रामस्थांनी 'हात' धुतल्यावर टाकल्या अक्षता...
sakal

बोलून बातमी शोधा

husband and wife second marriage at vaishali district bihar

वैशाली जिल्ह्यामध्ये एका युवतीला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तिने सर्व माहिती सांगितल्यानंतर गावात विवाह लावण्यात आला. संबंधित विवाहाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

ग्रामस्थांनी 'हात' धुतल्यावर टाकल्या अक्षता...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा (बिहार): वैशाली जिल्ह्यामध्ये एका युवतीला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तिने सर्व माहिती सांगितल्यानंतर गावात विवाह लावण्यात आला. संबंधित विवाहाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

विद्यार्थीनीने विरोध केला म्हणून जिवंत जाळले...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुझफ्फरपूर येथील युवकाचा आज (गुरुवार) विवाह होणार होता. पण, या युवकाने एक वर्षापूर्वीच कोर्ट मॅरेज केले होते. दोघेही आपापल्या घरी राहात होते. पहिला विवाह झालेला असतानाही युवक दुसरा विवाह करण्यास तयार झाला होता. त्याचा दुसरा विवाह गावात होणार होता. याबाबतची माहिती पहिल्या पत्नीला समजली. तिने तत्काळ गावाकडे धाव घेतली. गावात आल्यानंतर युवकाच्या नातेवाईकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण, तिचे ऐकन न घेता मारहाण करण्यास सुरवात केली. अनेकांनी तिला बेदम मारहाण केली. यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रण करून व्हायरल केले.

युवती टॉपलेस अवस्थेत चालत निघाली अन्...

युवतीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ काही क्षणातच तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर गेला. तिच्या नातेवाईकांनी तत्काळ चौकशी काढत गावाकडे धाव घेतली. युवतीचे नातेवाईक गावात आल्यानंतर काही वेळ वातावरण गंभीर बनले होते. पण, सर्वांसमोर युवतीने सर्व माहिती सांगितली. काही वेळातच दुसरा विवाह मोडत पहिल्या पत्नीसोबत विवाह लावून दिला. संबंधित विवाहाची चर्चा राज्यात जोरदार सुरू आहे.