डिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्‌घाटन

डिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्‌घाटन

तिरुचिरापल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी आज तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्‌घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री निर्माण करण्यास यामुळे बळकटी येणार आहे. 

या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये 3,038 कोटी रुपयांची गुंतवणूक उद्‌घाटनावेळीच जाहीर झाली आहे. यातील बहुतांशी गुंतवणूक ही सार्वजनिक क्षेत्रातून आली असून, ऑर्डनन्स फॅक्‍टरी बोर्ड, भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्‍स लिमिटेड यांनी अनुक्रमे 2,305 कोटी, 140.5 कोटी आणि 150 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. टीव्हीएस, डेटा पॅटर्न आणि अल्फा डिझाइन्स या खासगी कंपन्यांनीही अनुक्रमे 50 कोटी, 75 कोटी आणि 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लॉकहिड मार्टिन या जागतिक स्तरावरील बड्या कंपनीनेही गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा कॉरिडॉर चेन्नई, होसूर, सालेम, कोइमतूर आणि तिरुचिरापल्ली या शहरांदरम्यान असणार आहे. स्थानिक उद्योगांचा या कॉरिडॉरला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे सीतारामन यांनी या वेळी सांगितले.

"या कॉरिडॉरमुळे उद्योगांना नियोजनबद्ध आणि परिणामकारक वाहतूक करता येणार असून, त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. विविध संरक्षण निर्मिती केंद्रांमधील दळणवळण वेगाने आणि सोयीचे जावे, यासाठी हा कॉरिडॉर तयार केला आहे,' असे त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com