Cough syrup: कफ सीरप प्रकरणात WHO ची एन्ट्री! भारतातल्या अधिकाऱ्यांकडून मागवलं स्पष्टीकरण; 'या' प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल

WHO Seeks Clarification from Indian Authorities Over Contaminated Cough Syrup Deaths: ज्या औषधांमुळे मध्य प्रदेशात मुलांचा मृत्यू झाला ते औषध देशाबाहेर गेलं आहे का, याची चौकशीही जागतिक आरोग्य संघटनेने केल्याची माहिती कळतेय.
Cough syrup: कफ सीरप प्रकरणात WHO ची एन्ट्री! भारतातल्या अधिकाऱ्यांकडून मागवलं स्पष्टीकरण; 'या' प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल
Updated on

Madhya Pradesh Medicine Issue: मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा येथे दूषित कफ सीरपच्या सेवनाने २२ चिमुकल्यांचा जीव गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात घबराहट पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे.

भारतामध्ये बनलेलं हे दूषित औषध देशाबाहेर तर पाठवलेलं नाही ना? असा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. याबाबत अधिकृत माहिती घेतल्यानंतर कफ सीरप, कोल्ड्रिफ यावर 'ग्लोबल मेडिकल प्रॉडक्ट अलर्ट' जारी करण्याबाबत निर्णय घेणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com