Cough Syrup Deaths in Chhindwara
esakal
छिंदवाडा आणि राजस्थानमध्ये कफ सिरप सेवनामुळे १२ मुलांचा मृत्यू.
औषधात डायथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक आढळला.
संबंधित औषधांवर बंदी घालून डॉक्टर व फार्मासिस्ट निलंबित.
छिंदवाडा (मध्यप्रदेश) : कफ सिरप जीवघेणा ठरू शकतो, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र, मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरप पिल्याने (Cough Syrup Deaths in Chhindwara) आतापर्यंत नऊ मुलांचा मृत्यू झाला, तर राजस्थानात आणखी तीन मुलांचा बळी गेला. गेल्या २० दिवसांत मृतांचा आकडा १२ वर पोहोचला असून पाच मुले गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.