देश अराजकतेकडे चालला आहे; भाजप खासदार सावित्रीबाई फुले

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

'दलित समाजासाठी वंदनीय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेची घटना देशात घडत आहे. यामुळे देश अराजकतेकडे चालला आहे' अशी टिका भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली.

लखनऊ: 'दलित समाजासाठी वंदनीय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेची घटना देशात घडत आहे. यामुळे देश अराजकतेकडे चालला आहे' अशी टिका भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली. विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवरच निशाना साधला. फुले एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर आम्ही संविधानात बदल करण्यासाठी आलो आहोत. आरक्षण काढून टाकू, संविधान असे संपवू की ते असून नसल्यासारखेच असेल अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. देशाचे संविधान, आरक्षण संपविल्यास बहूजनांसोबत देशातील सर्वांचेच अधिकार संपुष्टात येतील असेही फुले म्हणाल्या.

अलिगड विद्यापीठात मोहम्मद अली जिना यांच्या छायचित्रावरून सुरू असलेल्या वादात फुले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. जिना हे महापुरुष होते आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तिथे जिना यांचे छायाचित्र लावण्यास काही हरकत नसल्याचे, फुले म्हणाल्या होत्या.

Web Title: The country is going on anarchy; BJP MP Savitribai Phule