विवाहासंदर्भात एकच कायदा हवा: रूपा गांगुली

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली : घटस्फोटाच्या तोंडी तलाक पद्धतीमुळे मुस्लिम महिलांना असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत विवाहासंदर्भात संपूर्ण देशभर एकच कायदा हवा, अशा प्रतिक्रियाज खासदार रूपा गांगुली यांनी व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाल्या, "तोंडी तलाक पद्धतीमुळे मुस्लिम महिलांना सुरक्षित असल्याचे वाटत नाही. विशेषत: ज्या महिला गरीब आहेत, ज्या काही बोलू शकत नाहीत, ज्यांना पतीशिवाय कोणताही आधार नाही, ज्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत अशा महिलांना सुरक्षित वाटत नाही.' तसेच तुम्ही एकाच देशात कायद्याचे वेगवेगळे भाग करू शकत नाहीत, असेही त्या पुढे म्हणाल्या. अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तोंडी तलाक पद्धतीला विरोध दर्शविला आहे. मुस्लिम महिलांना सुरक्षेच्या घटनात्मक अधिकाराची राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार खात्री देत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A country should have one law on marriage : Roopa Ganguly