कोलकाता- मेट्रोमध्ये एकमेकांच्या जवळ उभे असलेल्या जोडप्याला मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

रात्री 10 च्या सुमारास हे जोडपे मेट्रो स्थानकावर उभे होते. त्यावेळी गाडी आली असता, एका वयोवृद्धाला गाडीमध्ये चढायला झालेल्या त्रासावरुन हा वाद निर्माण झाला. एक एक करुन त्यानंतर तेथील जमावाने त्या जोडप्याला छेडछाड आणि मारहाण सुरु केली. 

कोलकाता - एका तरुण जोडप्याला काल (सोमवारी) रात्री कोलकाता मेट्रो स्टेशनवर जमावाने ते एकमेकांच्या खुप जवळ उभे असल्याच्या कारणावरुन छेडछाड केली. तसेच, त्यांना मारहाणही करण्यात आली. त्या तरुणाला जमाव मारण्याचा प्रयत्न करत असताना तरुणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तरुण-तरुणीला मारहाण करणाऱ्यांमध्ये मध्यमवयीन तरुणांसोबतच वृद्ध प्रवाशांचाही समावेश आहे. 

रात्री 10 च्या सुमारास हे जोडपे मेट्रो स्थानकावर उभे होते. त्यावेळी गाडी आली असता, एका वयोवृद्धाला गाडीमध्ये चढायला झालेल्या त्रासावरुन हा वाद निर्माण झाला. एक एक करुन त्यानंतर जमावाने त्या जोडप्याला छेडछाड आणि मारहाण सुरु केली.

या घटनेनंतर जवळपास 50 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी डमडम रेल्वे स्थानकाच्याबाहेर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली आहेत. निषेध नोंदवताना एका विद्यार्थ्याने 'मुलांना एकटे सोडा, त्यांना स्वतंत्रपणे वागू द्या' असे स्पष्ट म्हटले आहे. 

रेल्वे स्थानकांवर झालेल्या घटनेची कुठल्याही प्रकारची माहीती उपलब्ध नाही असे रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली नसल्याने पुढे काय करायचे तेही लक्षात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत जोडप्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्रेम व्यक्त करणे योग्य नसल्याचीही भावना काही लोकांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Couple Abused, Beaten For Standing Too Close Inside Kolkata Metro