Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Same-Sex Marriage

Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी

Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने केंद्राला १५ फेब्रुवारीपर्यंत  समलैंगिक विवाहाच्या याचिकांवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आणि सर्व याचिका मार्चपर्यंत सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी १३ मार्चला होणार आहे. (Same-Sex Marriage)

तसेच सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भात देशातील विविध उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असलेल्या सर्व याचिका स्वतःकडे हस्तांतरित केल्या आहेत. हे प्रकरणाची सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

खंडपीठाने या प्रकरणातील याचिकाकर्त्यांना व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर हजर राहण्यास, वकील करण्यास किंवा दिल्लीला प्रवास करण्यास असमर्थ असल्यास त्यांचे युक्तिवाद सादर करण्याचे स्वातंत्र्यही दिले आहे. या प्रकरणाची शेवटची सुनावणी १४ डिसेंबर २०२२ रोजी झाली होती. 

हेही वाचा: Same-Sex Marriage : समलैंगिक विवाह म्हणजे काय? आतापर्यंत जगात किती देशांनी दिली आहे कायदेशीर मान्यता

यादरम्यान, न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली होती आणि विशेष विवाह कायद्यांतर्गत  समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याच्या मागणीसाठी केलेल्या नवीन याचिकेवर उत्तर मागितले होते.

हेही वाचा: Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; अजामीनपत्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?