इमेलद्वारे अर्ज स्विकारण्याचे न्यायालयाचे आदेश

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायतराज निवडणुकीत जे उमेदवार आपला अर्ज इमेलद्वारे स्विकारतील तो स्विकारावा असे आदेश कोलकता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
 

कोलकता  : पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायतराज निवडणुकीत जे उमेदवार आपला अर्ज इमेलद्वारे स्विकारतील तो स्विकारावा असे आदेश कोलकता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

कोलकता उच्च न्यायालयाचे विभागीय खंडपीठाचे न्यायाधिश बी. सोमाद्देर आणि ए. मुखर्जी यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाला 23 एप्रिलच्या दुपारी तीनपर्यंत ज्यांचे अर्ज इमेलच्याद्वारे आले आहेत ते स्विकारावेत, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणी माकपच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेबाबत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. माकपने सादर केलेल्या उमेदवारी यादीतील ज्या उमेदवारांचे अर्ज वैध असतील ते स्विकारावेत. 
 

Web Title: Court orders to accept application through email