court orders registration of case against karnataka minister k sudhakar
court orders registration of case against karnataka minister k sudhakarsakal

K Sudhakar : मंत्री सुधाकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने फौजदारी गुन्हा नोंदवून समन्स बजावले

स्थायी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष आर. अंजनेय रेड्डी यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता

बंगळूर : आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने फौजदारी गुन्हा नोंदवून समन्स बजावले. स्थायी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष आर. अंजनेय रेड्डी यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दाखल केलेल्या गुन्ह्यांची दखल घेऊन बंगळूरच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने मंत्री सुधाकर यांना समन्स बजावून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस-धजद आघाडी सरकारच्या काळात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री सुधाकर यांच्या नियुक्तीला आव्हान देणारा अर्ज अंजनेय रेड्डी यांनी न्यायालयात दाखल केला होता.

शेतकऱ्याला गावठी मद्य पाजून तुरुंगात गेलेली व्यक्ती आपल्याविरुध्द आंदोलन करीत आहे, असा आरोप त्यावेळी आमदार असलेल्या सुधाकर यांनी केला होता. त्यानंतर हा आपला अपमान असल्याचे सांगत अंजनेय रेड्डी यांनी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. मानहानीचा खटला हा फौजदारी खटला मानला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या आधारे अंजनेय रेड्डी यांनी सुधाकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com