कुटुंबियांचा विरोध डावलून मावस बहिणींनी केला विवाह

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

उत्तर प्रदेशातील वाराणसीत दोन मावस बहिणी विवाहबद्ध झाल्या आहेत. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी हा समलैंगिक विवाह केला आहे. लग्नसोहळा आटोपून या दोन्ही मुलींनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाराणसी: उत्तर प्रदेशातील वाराणसीत दोन मावस बहिणी विवाहबद्ध झाल्या आहेत. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी हा समलैंगिक विवाह केला आहे. लग्नसोहळा आटोपून या दोन्ही मुलींनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाराणसी शहरातला हा पहिला समलैंगिक विवाह असल्याचे सांगितले जात आहे. वाराणसीत सर्वत्र सध्या या विवाहाच्याच चर्चा आहेत. रोहानिया या गावच्या या मुली काल (ता.04) बुधवारी एक शिवमंदिरात गेल्या. त्या शिवमंदिरात गेल्यावर त्यांनी पुजाऱ्याकडे लग्नाचा हट्ट धरला. यावर पुजाऱ्याने लग्न लावण्यास मनाई केली. परंतु, या मुली खूप वेळ हट्ट सोडत नव्हत्या हे पाहून पुजाऱ्याने त्या दोघींचे लग्न लावून दिले.

लग्न पार पडल्यावर मात्र, मंदिराबाहेर या दोन्ही मुलींना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. लग्नकार्य संपल्यावर मुलींनी तिथून काढता पाय घेतला मात्र, लोकांनी मात्र पुजाऱ्याला पकडले. या दोन मुलींची माहिती देताना पुजाऱ्याने सांगितले की, एक मुलगी कानपुरची असून ती शिक्षणासाठी वाराणसीत आलेली आहे. ती आपल्या मावस बहिणीसोबत रहायची आणि तिने आता तिच्यासोबतच विवाह केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cousin sisters marry each other against family wishes in Varanasi