‘कोव्हॅक्सिन’ लस ८१ टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

वृत्तसंस्था
Thursday, 4 March 2021

भारत बायोटेकने तयार केलेली स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस प्रतिकारक्षमतेच्या बाबतीत अधिक वरचढ असल्याचे दिसून आले आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष आज कंपनीकडून जारी करण्यात आले त्यात ही लस ८१ टक्के प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे.

हैदराबाद - भारत बायोटेकने तयार केलेली स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस प्रतिकारक्षमतेच्या बाबतीत अधिक वरचढ असल्याचे दिसून आले आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष आज कंपनीकडून जारी करण्यात आले त्यात ही लस ८१ टक्के प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराला रोखण्याचे सामर्थ्य देखील या लशीत आहे. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संशोधन संस्थेने केलेल्या विश्‍लेषणातून ही लस नव्या विषाणूलाही रोखत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, केंद्र सरकारने या लशीला जानेवारी महिन्यामध्येच आपत्कालिन वापरासाठी मंजुरी दिल्याने विरोधकांसह अनेकांनी त्याला आक्षेप घेतला होता. या लशीचे शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झालेले नसल्याने तिला मान्यता देण्यात येऊ नये, असे काही अभ्यासकांचे म्हणणे होते. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मिळून ही लस तयार केली आहे. या लशीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील चाचणीमध्ये २५ हजार ८०० जणांचा समावेश होता. या आधारे या लशीची प्रतिकार क्षमता निश्‍चित करण्यात आली आहे. ही लस २ ते ९ डिग्रीला स्थिर राहते. रेडी टू यूज लिक्वीड फॉर्मेशनमुळे तिची वाहतूक करणे देखील तुलनेने सोपे आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील बड्या नेत्यांनी कोव्हॅक्सिन हीच लस घेतली आहे.

तमिळनाडूत राजकीय भूकंप; शशिकलांचा राजकीय संन्यास!

या लशीचा निर्मितीपासून ते लोकांपर्यंत पोचण्याचा प्रवास हा आठ महिन्यांपेक्षाही कमी आहे. ही लस आत्मनिर्भर भारताचे चित्र अधिक समर्पकपणे मांडते. भारत आता लस निर्मिती क्षेत्रातील सुपरपॉवर बनले असल्याचे यातून अधोरेखित होते.
- डॉ. बलराम भार्गव, महासंचालक आयसीएमआर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covaxin Bharat Biotech claims 81 percent effective vaccine