
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन, डेल्टावर भारी - भारत बायोटेक
नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संसर्गामुळं देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटमुळं (Delta Variant) मोठी जीवितहानी झाली होती. दरम्यान, एक दिलासादायक बातमी आली आहे. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस (Booster Dose) ओमिक्रॉन आणि डेल्टाला निष्क्रीय करण्याची क्षमता आहे, असं चाचण्यांमधून दिसून आल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे. (COVAXIN booster shown neutralize Omicron Delta variants of corona virus says Bharat Biotech)
कोव्हॅक्सिन (Covaxin) ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप किंवा अंग दुखत असल्यास त्यावर पॅऱासिटॅमोल (Paracetamol) ही टॅब्लेट घेण्याची गरज नाही, असं स्पष्टीकरण भारत बायोटेकनं नुकतंच दिलं. लहान मुलांच्या लसीकरणादरम्यान काही लसीकरण केंद्रांवर लस घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटॅमोल किंवा पेनकिलर गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर लस निर्मात्या कंपनीनं यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
हेही वाचा: मोठा निर्णय! आता सर्व दुकानांवरील पाट्या कराव्या लागणार मराठीत
यावर स्पष्टीकरण देताना भारत बायोटेकनं म्हटलं की, आमच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ३०,००० लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये १० ते २० टक्के व्यक्तींना साईड इफेक्ट जाणवले आहेत. बऱ्याच जणांमध्ये हे साईड इफेक्ट सौम्य स्वरुपाचे आहेत, जे एक-दोन दिवसात निघून जातात. त्यामुळं त्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध घेण्याची गरज नाही. केवळ तुमच्या डॉक्टरांनी जर औषध गरजेची आहेत अशी शिफारस केली तर लस घेतल्यानंतर औषधांची गरज पडते.
Web Title: Covaxin Booster Shown Neutralize Omicron Delta Variants Of Corona Virus Says Bharat Biotech
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..