esakal | तिसऱ्या लाटेला असं रोखणार का? शिमलामध्ये पर्यटकांची तोबा गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

manali

हिमाचल प्रदेशात पोहोचलेल्या पर्यटकांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे.

तिसऱ्या लाटेला असं रोखणार का? शिमलामध्ये पर्यटकांची तोबा गर्दी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

शिमला- हिमाचल प्रदेशात पोहोचलेल्या पर्यटकांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. अशा स्थितीत पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने टीका केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. लोकांनी गर्दी न करणे गरजेचं आहे. पण, मनाली, शिमलामध्ये आलेल्या लोकांना कसलीही काळजी किंवा भीती नसल्याचं दिसत आहे. मास्क न लावता, सोशल डिस्टेंसिंग न ठेवता लोक बिंधास्त फिरताना दिसून आले. (Covid 19 hotels fully booked as tourists throng Himachal Pradesh shimla)

उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी लोक शिमला, कुफरी, नारकंडा, डलहोसी, मनाली, लाहोल आणि इतर डोंगरी भागात जात आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मनालीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना कोरोनाची कोणतीही भीती आहे. लोक एकमेकांना चिटकून चालत आहेत. गर्दी करुन थांबले आहे. अशा दृष्यांमुळे राज्य सरकारच्या तयारीवर प्रश्व उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा: कोविन ॲप जगाला देण्यास तयार; नरेंद्र मोदी

हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करण्यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आणि ई-पासची आवश्यकत नाही. राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन विभागाचे अधिकारी अमित कश्यप यांनी न्यूज एजेन्सी एएनआयला सांगितलं की, जूनमध्ये कोरोना नियमांवर शिथिलता देण्यात आल्यानंतर, राज्यात 6 ते 7 लाख पर्यटक आले आहेत. देशाच्या उत्तर भागात आलेल्या लूमुळे पर्यटकांची वाढ झाली आहे.

हेही वाचा: चर्चा ‘टीम मोदी’च्या विस्ताराची; यांची वर्णी लागण्याचा अंदाज

सर्व हॉटेल्स पूर्णपण फूल

हिमाचल प्रदेशच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा 7 टक्के आहे. असे असले तरी लोकांनी दाखवलेला निष्काळजीपणा टीकेचे कारण बनले आहे. लोक स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. काही काळापूर्वी हॉस्पिटल्स हाऊसफूल होते आता हॉटेल्स फूल झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, वीकेंडच्या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक शिमलामध्ये येत आहे. हॉटेल, होम स्टे पूर्ण क्षमतेसह फूल भरले आहेत.

loading image