esakal | भारतात 40 कोटी नागरिकांनी घेतली लस
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

भारतात कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत एकत्रित 40 कोटी जणांना लस देण्यात आली आहे.

भारतात 40 कोटी नागरिकांनी घेतली लस

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारतात कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत एकत्रित 40 कोटी जणांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 40 कोटी 44 लाख 67 हजार 526 जणांनी लस घेतली. शनिवारी दिवसभरात 46 लाख 38 हजार 106 जणांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 1 कोटी 2 लाख 68 हजार 882 इतकी आहे तर 75 लाख 38 हजार 877 जणांना दोन्ही डोस घेतले आहेत. फ्रंट लाइन वर्कर्समध्ये 1 कोटी 77 लाख 91 हजार 635 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 1 कोटी 3 लाख 41 हजार 848 जणांनी घेतला आहे

लसीकरण मोहिम तीन वयोगटात टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली होती. यामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये 7 कोटी 20 लाख 61 हजार 327 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 कोटी 11 लाख 75 हजार 952 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 45 वर्षांवरील 9 कोटी 74 लाख 18 हजार 789 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 2 कोटी 90 लाख 12 हजार 289 जणांनी घेतला आहे.

हेही वाचा: 24 तासांत देशात 38,079 नवे रुग्ण; 560 जणांचा मृत्यू

18 ते 44 वयोगटातील 12 कोटी 40 लाख 7 हजार 69 जणांनी पहिला डोस घेतलाय. तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 48 लाख 50 हजार 858 इतकी आहे. इतर वयोगटातील नागरिकांच्या तुलनेत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसते. एकूण लस घेतलेल्यांपैकी 32 कोटी 15 लाख 47 हजार 702 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 8 कोटी 29 लाख 19 हजार 824 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांच्या आत आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात देशात 38 हजार 79 नवीन रुग्ण आढळले. तर 506 जणांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे शुक्रवारी 43 हजार 916 जण कोरोनामुक्त झाले. देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्क्यांवर पोहचला आहे.

loading image