esakal | कोरोनाचा कहर! भारतात एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

COVID UPDATES

भारतातील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 4 हजार 598 झाली आहे.

कोरोनाचा कहर! भारतात एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. बुधवारी देशात आतापर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 76 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर भारतातील कोरोनामुळे मृत्यूची संख्या 60 हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 24 तासात 76 हजार नवे रुग्ण आढळले. भारतात याआधी एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 22 ऑगस्टला सापडले होते. तेव्हा एका दिवसात 70 हजार 488 जण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 4 हजार 598 झाली आहे. 

गेल्या आठवड्याभरात एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 60 ते 65 हजाराने वाढत आहे. दुसरीकडे कोरोना टेस्टची संख्या वाढत असल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त दिसून येत असल्याचंही म्हटलं जात आहे. 25 ऑगस्टला भारतात 8.2 लाख कोरोना चाचण्या झाल्या तर 26 ऑगस्टला 9.2 लाख चाचण्या घेण्यात आल्या. 

रुग्णसंख्या वाढत असली तरी घटत असलेला मृत्यू दर आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात गेल्या 11 दिवसात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या आधी 10 दिवसात 10 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर 1.8 टक्के इतका झाला. बुधवारी दिवसभरात 1 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 60 हजार 543 इतकी झाली. 

हे वाचा - जग व्हॅक्सिनच्या मागे आणि उत्तर प्रदेशात पोटातले जंत मारण्याच्या औषधाने कोरोनावर उपचार

देशात कोरोनाचा कहर  सूरु असताना आता दिल्ली पहिलं राज्य ठरलं आहे, जिथं 90 टक्के रुग्ण बरे होऊन (recovery rate) घरी परतले आहेत. आतापर्यंत  दिल्लीत 1.62 लाख लोकांना कोरोनाचा झाला असून त्यातील 1.46 लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत. दिल्लीनंतर देशातील तमिळनाडू, बिहार आणि हरियाणा या राज्यातही कोरोना रुग्ण  बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. या तीन राज्यातील रिकव्हरी रेट 80 टक्क्याहून अधिक राहिला आहे. तर इतर 13 राज्यातील हे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत संसर्ग झालेल्या 1.62 लाखांपैकी 1.46 लाखाहून अधिक लोक बरे झाले असल्याचे जाहीर झाले आहे.