Unlock 4 मध्ये 1 सप्टेंबरपासून काय बदलणार?

unlock 4
unlock 4

नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये आता हळू हळू शिथिलता दिली जात आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु करण्यासाठी टप्प्या टप्प्याने परवानगी दिली जात आहे. देशात सध्या अनलॉक 3 सुरु असून 31 ऑगस्टपर्यंत संपणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून देशभरात अनलॉक 4 बद्दलची नियमावली सरकार जाहीर करू शकतं. यामध्ये मेट्रोची सुविधाही सुरू केली जाऊ शकते. पण आता सुरु होणाऱ्या मेट्रोच्या सुविधेमध्ये पहिल्यापेक्षा बराच बदल असेल.  

1 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते मेट्रो- 
देशात 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 सुरू होत आहे. दिल्लीतील मेट्रो सुरू होण्याची वाट बघणाऱ्यासाठी आता खूशखबर आहे, कारण ही सुविधा 1 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. याअगोदर दिल्लीतील वाढती कोरोना परिस्थिती पाहून 22 मार्चला मेट्रोची सुविधा बंद केली होती. सुत्रांच्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या काळात DMRC ला  (Delhi Metro Rail Corporation) 1300 कोटींचं नुकसान झालं आहे. दिल्ली सरकारसोबत विरोधी पक्ष असणाऱया भाजपानेही दिल्लीत मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यास साकडं घातलं आहे. त्याचबरोबर डीएमआरसीनेही सर्व तयारी केली असून केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच दिल्लीतील मेट्रो सुरू होईल.

अनलॉक 4 मध्ये शाळा उघडू शकतात
केंद्र सरकार 1 सप्टेंबरपासून अनलॉक -4  सुरू करत असताना आता याकाळात शाळादेखील सुरू होऊ शकतात. यासाठी 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन राज्यातील सचिवांशी या योजनेवर चर्चा झाली आहे. काही राज्ये शाळा सुरू करण्याबद्दल अनुकूल असले तरी राज्य सरकारच्या या योजनेला पालकांकडून फारसा पाठिंबा मिळालेला नाही

विमानसेवा महाग होऊ शकते-
येणाऱ्या 1 सप्टेंबरपासून विमानसेवाही महाग होऊ शकतात. नागरी उड्डाण मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) १ सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून उड्डाण सुरक्षा शुल्क (एएसएफ) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एएसएफ फी म्हणून आता स्थानिक प्रवाशांकडून 150 च्या ऐवजी 160 रुपये आकारले जातील, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 4.85 ऐवजी 5.2 डॉलर्स आकारले जातील. त्यामुळे आता विमानसेवा महागण्याची शकतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एलपीजीची किंमती घसरू शकते-
दोन दिवसांपुर्वी RBI ने 2019-20 चा अर्थिक अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये मोठी बेरोजगारी आणि महागाई वाढली असल्याचे सांगितलं होतं. सध्याही देशात कोरोनामुळे महागाईचा दर चांगलाच वाढत आहे, दुसरीकडे एलपीजी लवकरच स्वस्त होऊ शकेल अशी चिन्हे दिसत आहेत. 1 सप्टेंबरपासून  एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरू शकतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किंमती बदलत असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com