Covid -19 Update I दिलासादायक, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत घट | Covid Patient Updates in India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 News | Covid Patient Updates

भारतात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 16, 678 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दिलासादायक, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत घट

देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून देशवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे, पण वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या चिंतेचं कारण बनत चालली आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 16, 678 नवीन प्रकरणे नोंदवली गेली असून यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 14, 629 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. (Covid-19 News)

हेही वाचा: गोवा काँग्रेसला वाचवण्यासाठी सोनिया गांधींनी संकटमोचक म्हणून महाराष्ट्राच्या नेत्याला पाठवलंय

देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची कमी भर पडली आहे. मात्र सक्रिय रुग्णांचा आलेख मात्र चढतानाच दिसत आहे. देशात सध्या 1 लख 30 हजार 713 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजारांपार गेली आहे. त्यामुळे चितेंत भर पडत चालली आहे. रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात 2 हजार 591 नव्या रुग्णांची भर पडली आहे.(Covid Patient Updates in India)

दिलासादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. तसेच 2 हजार 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 37 हजार 679 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.92% इतका झाला आहे.

हेही वाचा: पोलिसांच्या कमतरतेमुळे आंबोलीत तीन ते चार तास वाहतूक कोंडी

Web Title: Covid 19 Updates In India Last 24 Hours Report 16678 New Cases And 26 Dead By Coronavirus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..