150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; मोदी म्हणतात, 'अशक्यही शक्य...'

Corona Vaccination
Corona Vaccinationsakal

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत १५० कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्याचे ऐतिहासिक उद्दिष्ट देशाने आज साध्य केले. लसीकरण (COVID-19 vaccination drive) सुरू झाल्यावर एका वर्षाच्याही आत हा टप्पा गाठणे म्हणजे कोणतेही असाध्य आव्हान साध्य करण्याच्या देशवासीयांच्या नव्या इच्छाशक्तीचेच प्रतीक आहे, अशी भावना व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे अभिनंदन केले. १५ ते १८ वयोगटातील तब्बल दीड कोटी मुलांचे पहिल्या पाच दिवसांत विक्रमी लसीकरण झाले याचाही त्यांनी उल्लेख केला. (Prime Minister Narendra Modi)

Corona Vaccination
कालीचरणला जामीन मंजूर; भडकाऊ वक्तव्याप्रकरणी होता अटकेत

ते म्हणाले की नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात १५० कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार झाला आहे. जगातील बहुतांश मोठ्या देशांसाठी हे मोठे आश्चर्य ठरले आहे. मात्र ही भारताची नवी इच्छाशक्ती व तिचेच प्रतीक आहे. कोलकत्यातील चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या (सीएनसीआय) विस्तारित रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात मोदी म्हणाले की लसीकरणाचा हा तो ऐतिहासिक टप्पा भारताने पार केला तो १३० कोटी लोकांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.

Corona Vaccination
मुंबईतील रूग्णसंख्या पुन्हा 20 हजार पार; सहा जणांचा मृत्यू

देशातील १५० कोटींपैकी ६२ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे दोन्ही टप्प्यातील कोरोना लसीकरण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटद्वारे दिली. 'ऐतिहासिक प्रयास, ऐतिहासिक उपलब्धी‘ अशा शीर्षकाच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की पंतप्रधान मोदींचे यशस्वी नेतृत्व व आरोग्य सेवकांच्या अविरत मेहनतीने हा टप्पा गाठला आहे. जेव्हा सारेजण मिळून अथक प्रयत्न करतात तेव्हा कितीही अशक्य वाटणारे लक्ष्यही साध्य केले जाऊ शकते.

लसीकरणाचे आकडे

एकूण : १ अब्ज ५० कोटी १७ लाख २३, हजार ९११

पहिला डोस घेतलेले : ८७ कोटींपेक्षा जास्त

दोन्ही डोस घेतलेले : ६२ कोटी ४४ लाख ०८ हजार ९३६

किमान एक डोस घेतलेले ज्येष्ठ नागरिक : ९० टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com