esakal | लस डेल्टा व्हेरियंटवर आठ पट कमी प्रभावी; संशोधकांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना प्रतिबंधक लसीने शरीरात निर्माण केलेल्या अँटिबोडींवर डेल्टा व्हेरियंट आठ पटीने कमी प्रभावी असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

लस डेल्टा व्हेरियंटवर आठ पट कमी प्रभावी; संशोधकांचा दावा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना प्रतिबंधक लसीने शरीरात निर्माण केलेल्या अँटिबोडींवर डेल्टा व्हेरियंट आठ पटीने कमी प्रभावी असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या SARS-CoV-2 विषाणूपेक्षा डेल्टा व्हेरियंट लशीला प्रतिसाद देण्यात कमी संवेदनशील आहे. कोरोना प्रतिबंधक लस डेल्टा व्हेरियंट किंवा B.1.617.2 विरोधात आठ पटीने कमी प्रभावी आहे, असं अभ्यासात सांगण्यात आलंय. डेल्टा व्हेरियंट सर्वप्रथम भारतामध्ये सापडला होता. त्यानंतर तो जगभरात पसरला आहे. (Covid 19 vaccines could be 8 times less effective against Delta variant)

PTI च्या वृत्तानुसार, भारतातील तीन केंद्रातील 100 पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा या अभ्यासात समावेश करुन घेण्यात आला होता. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलचाही यात समावेश होता. भारतातील संशोधक आणि कॅब्रिज इन्स्टिट्यूटमधील (Cambridge Institute of Therapeutic Immunology and Infectious Disease) संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलंय की, सुरुवातीच्या कोरोना स्वरुपापेक्षा डेल्टा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि इम्युनिटीला चकमा देणारा आहे, असं संशोधकांनी म्हटलं.

हेही वाचा: वाघ-अस्वलांना दिली कोरोना लस; वानरे आणि डुकरांनाही मिळणार

डेल्टा व्हेरियंट चीनमध्ये आढळून आलेल्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. शिवाय यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता वाढते. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पण, पुढील काळातील तिसऱ्या लाटेपासून वाचायचं असेल तर लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहेत. डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहेत. त्यामुळे याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

भारतात सापडलेला डेल्टा B.1.617.2 व्हेरियंट यूकेमध्ये आढळलेल्या B.1.617.1 व्हेरियंटपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. अभ्यासात असाही दावा करण्यात आलाय की, मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता कमी होऊ शकते. शिवाय डेल्टा व्हेरियंटमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशात दररोज 50 हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. असे असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे काही राज्यांमुळे निर्बिंध शिथिल होण्यास वेळ लागणार आहे.

loading image