धक्कादायक ! मार्च 2021 पर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या होऊ शकते 'इतके' कोटी

धक्कादायक ! मार्च 2021 पर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या होऊ शकते 'इतके' कोटी

मुंबई : देशात कोविड बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण असेच राहील्यास मार्च 2021 पर्यत देशात कोरोना बाधितांची संख्या कमीत कमी 37.4 लाख तर जास्तीत जास्त 6.18 कोटी पर्यंत जाईल. भारतीय विज्ञान संस्थेने हा इशारा दिला आहे.

या दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 6.3 लाखावर जाईल. तर  दिल्लीत 1.6 लाख कोरोना बाधित असणार आहे. तामिळनाडूत 1.8 लाख, गुजरातमध्ये 61 हजार रुग्ण सापडतील असही या अहवालात सांगण्यात आले आहे. 1 सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनामुळे 1.4 लाख लोकांचा मृत्यु होईल. यात सर्वाधिक 25 हजार मृत्यु एकट्या महाराष्ट्रात तर दिल्लीत 9,700, तामीळनाडूत 6300, कर्नाटकमध्ये 8500, तर  गुजरातमध्ये 8500 मृत्यु होईल.असा अंदाजही या अभ्यासातून करण्यात आला आहे. 

23 मे ते 18 जून या दरम्यान कोरोना संसर्गाच्या आकडेवारीचा अभ्यास करुन भारतीय विज्ञान संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र सध्या कोविड 19 संसर्गाचे प्रमाण आणि  परिस्थिती बघता हा अंदाज चूकू शकतो असही या संस्थेने स्पष्ट केले आहे.

अत्यंत वाईट परिस्थितीत  कोरोना संसर्ग मार्च 2021 आपल्या उंचीवर पोहोचणार नाही. तर चांगले चित्र म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर पर्यंत कोरोना संसर्ग आपल्या उंचीपर्यंत पोहोचू शकतो. आठवड्यात दोन ते तीन दिवसाचे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन केल्यास संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते. असही या संस्थेने म्हटले आहे. 

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, यामध्ये अधिक सुधारणा झाल्या पाहीजे यामघ्ये चांगले उपचार, वेळेवर विलगीकरणच्या सुधारणांची गरज आहे. कोरोनावर अद्यापही लस न आल्यामुळे कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, क्वारंटाईन, सोशल डिस्टसिंग हे कोरोना संसर्गावर मात करण्याचे चांगले पर्याय आहेत असंही या अहवालात म्हटले आहे. 

24 तासात 33 हजार रुग्ण

देशात गेल्या 24 तासात देशात 32,695 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 606 जणांचा मृत्यु झाला आहे. देशात एकुण कोरोना रुग्णांची संख्या 9,68,876 एवढी झाली आहे. तर आतापर्यत 6,12,815 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 24,915 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

covid patients count might reach upto six crore eighteen lacs by march2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com