राजस्थानच्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात,'या' काँग्रेसच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी होणार?

राजस्थानच्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात,'या' काँग्रेसच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी होणार?

मुंबईः  राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतला आहे. काँग्रेस पक्ष आता अशा नेत्यांना थेट घरचा रस्ता दाखवणार आहे. त्यात काँग्रेसचे नेते संजय झा यांनी उघडपणे सचिन पायलट यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता  माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडकडे याबाबत रिपोर्ट सादर करुन संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाच्या आरोप ठेवण्यात आला आहे. 

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, सचिन पायलट यांच्या प्रकरणानंतर आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तसेच पक्षाला मारक ट्विट करणारे काही नेतेही एआयसीसीच्या रडारवर आहेत.

संजय निरुपम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्षविरोधी वक्तव्य करत पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवरही त्यांनी सातत्यानं टीका केलीय. आताच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याजवळील मालमत्ता खरेदीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर शिवसेनेने महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत तीव्र निषेध नोंदविला होता. 

गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान निरुपम यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच आव्हान दिलं होतं.  ते म्हणाले होते की, कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत, त्यातील एक सोनिया गांधी आणि दुसरे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आहेत. सोनियाचे राजकीय सल्लागार अहमद पटेल  यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला होता.

पायलट यांच्या बंडानंतरही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. जर सर्व लोक एकेक करून निघून गेले तर पक्षात कोण राहील? त्यामुळे ज्याला जायचं असेल त्यांना जाऊ द्या असं समजू नका अशी विचारसरणी आजच्या संदर्भात चुकीची आहे. सचिन पायलट समजावून सांगा आणि थांबवा असं ते म्हणाले होते.

 आपले ट्विट्स किंवा वक्तव्य पक्षविरोधातील आहेत, असं आपल्याला वाटत नाही, असं निरुपम यांना वाटतं. महाविकास आघाडी स्थापन करू नये हे माझं पहिल्या दिवसापासूनचं मत होतं. आताही सरकारमध्ये काँग्रेसची काहीच भूमिका नाही आहे. सर्व काम शिवसेना आणि एनसीपीच करत आहे. गेल्या सहा महिन्यात सरकारमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच दिसून आलेलं नाही. संपूर्ण पक्ष क्वारंटाईन झाला आहे,  अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली.

congress will remove sanjay nirupam from party because of anti party action

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com