Corona third wave | तिसरी लाट तीव्र की सौम्य? फेब्रुवारी-मार्चदरम्यान उद्रेकाबाबत तज्ज्ञ सांगतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona third wave

तिसरी लाट तीव्र की सौम्य? फेब्रुवारी-मार्चदरम्यान उद्रेकाचा इशारा

मुंबई : गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर युरोपमध्ये डिसेंबरदरम्यान कोरोनाचा संसर्ग (coronavirus) मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे आढळते. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी- मार्चमध्ये आपल्याकडे प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते. दरम्यान रशिया, जर्मनीसह विविध देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, भारतात फेब्रुवारी- मार्चदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. पण तिसरी लाट घातक असेल की तीव्र? याबाबत तज्ञांनी इशारा दिला आहे.

तिसरी लाट फेब्रुवारी- मार्चमध्ये?

देशात ऑगस्टपासून जवळपास निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले, मात्र असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा वाढलेला नाही. मृतांचे प्रमाणही हळूहळू कमी होत आले आहे. त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी फेब्रुवारी- मार्चमध्येच येईल. परंतु, ती सौम्य प्रमाणात असेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. जर्मनी, रशियातील प्रादुर्भाव वाढण्यास प्रामुख्याने करोनाचे ‘डेल्टा’ हे उत्परिवर्तन कारणीभूत ठरले आहे. भारतात ‘डेल्टा’चा उगम झाला. देशात दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्यास ‘डेल्टा’च कारणीभूत होता. आता देशातील नागरिकांमध्ये ‘डेल्टा’विरोधात बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून, लसीकरणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात करोनाचे उत्परिवर्तन झाले तरी ते घातक नसेल तर तिसरी लाट सौम्य असेल. तसेच करोनाचे उत्परिवर्तन होण्याचा वेग कमी झाला असून, गेल्या काही महिन्यांत नवे उत्परिवर्तन आढळलेले नाही. त्यामुळे ‘डेल्टा’ इतके घातक उत्परिवर्तन निर्माण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु होणारच नाही असे ठामपणे सांगता येणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

हेही वाचा: Railway PRS system | पुढील 7 दिवस प्रवासी आरक्षण प्रणाली बंद

....म्हणून दुसऱ्या लाटेला तोंड द्यावे लागले

राज्यात दुसरी लाट ओसरली असली तरी मुंबईत दररोज सुमारे तीनशे रुग्ण आढळत आहेत, तर राज्यात हे प्रमाण सुमारे एक हजार आहे. त्यामुळे करोनाची साथ पूर्णत: संपलेली नाही. वातावरणात अजूनही विषाणू आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन, चाचण्या, निदान यावर भर न दिल्यास कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनाची शक्यता नाकारता येत नाही, गेल्या वर्षी याच काळात कोरोनाची पहिली लाट ओसरली होती, परंतु करोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी होता. कोरोनाची साथ संपल्याचा गैरसमज करून नागरिकांनी प्रतिबंधाचे सर्व नियम धुडकावून लावले होते. परिणामी कोरोनाचे उत्परितर्वन झाले. ‘डेल्टा’ने फेब्रुवारीपासून पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आणि आपल्याला दुसऱ्या लाटेला तोंड द्यावे लागले.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी

विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला तरी वातावरणात त्याचे अंश असतात. विषाणूविरोधात नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे विषाणूची ताकद कमकुवत व्हायला सुरुवात होते, अशावेळी अधिक तीव्रतेने रोगप्रतिकारक शक्तीविरोधात लढण्यासाठी विषाणू स्वत:च्या रूपामध्ये बदल करून अधिक शक्तिशाली बनतात. यालाच विषाणूचे उत्परिवर्तन म्हणतात. जितका काळ विषाणू अधिक संख्येने वातावरणात राहील तितके त्याचे परावर्तन होण्याची शक्यता अधिक असते.

loading image
go to top