Railway PRS system | पुढील 7 दिवस 'या' वेळेत प्रवासी आरक्षण प्रणाली बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway

Railway PRS system | पुढील 7 दिवस प्रवासी आरक्षण प्रणाली बंद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मोबाइल अॅप अथवा संकेतस्थळावरून रेल्वे प्रवासासाठी तिकिट आरक्षित (Railway ticket reservation) करताय? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी... पुढील ७ दिवस रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (railway PRS system) दररोज सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा रात्री 23.30 वाजल्यापासून ते सकाळी 5.30 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ही तांत्रिक प्रक्रिया आज रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. ही तांत्रिक बदल प्रक्रिया 20-21 नोव्हेंबर रात्रीपर्यंत सुरू असणार आहे. या कालावधीत तिकिट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

रेल्वेचे तिकिट दर आणि रेल्वे क्रमांक अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवस PRS यंत्रणा बंद असणार आहे. प्रवासी सेवा सामान्य करण्याच्या आणि टप्प्याटप्प्याने कोरोना स्तरावर परत येण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) पुढील 7 दिवसांसाठी रात्रीच्या वेळी 6 तासांसाठी बंद केली जाईल. सिस्टीम डेटाचेअपग्रेडेशन आणि नवीन ट्रेन नंबरचे अपडेटसाठी सक्षम करण्यासाठी हे काम केले जाणार आहे. सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात मागील काळातील जुन्या ट्रेन क्रमांक आणि वर्तमान प्रवासी बुकिंग डेटा अद्ययावत केला जाणार आहे. तिकीट सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काळजीपूर्वक कॅलिब्रेट केलेल्या टप्प्यात आणि रात्रीच्या वेळी अंमलात आणल्या जातील. कोरोना महासाथीचा संसर्ग दर कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनचे संचालन बंद करण्याचा आणि नियमित ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकिट दरात दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात प्रवाशांना 30 टक्के अधिक तिकिट दर मोजावा लागत होता.

हेही वाचा: 'काम बंद' आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच !

loading image
go to top