ब्रिटन दौऱ्यानंतर PM मोदी घेणार कोरोनासंदर्भात तातडीची बैठक

सप्टेंबर महिन्यात कोविड लसीकरण केलेल्यांची संख्या २४ कोटी इतकी होती.
covid -19
covid -19esakal
Summary

सप्टेंबर महिन्यात कोविड लसीकरण केलेल्यांची संख्या २४ कोटी इतकी होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यानंतर तात्काळ एक बैठक घेणार आहेत. ज्यामध्ये कोरोनाच्या स्थितीसंदर्भात आढावा घेतला जाईल. ऑक्टोबर महिन्यात झालेले कोरोना लसीकरणाचे आकडे, रुग्णालयातील लसीकरणाचे घटलेले प्रमाण आणि सणांमुळे बाजारात वाढलेली गर्दी हे तीन मुद्दे केंद्र सरकारची काळजी वाढवणारे ठरले आहेत. या कारणांमुळे केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात कोविड लसीकरण केलेल्यांची संख्या २४ कोटी इतकी होती. याशिवाय वापर न झालेले लसीकरणाचे जवळपास १५ कोटी डोस रुग्णालयात पडून आहेत. ऑक्टोबरमध्ये हे १७ कोटी इतके झाले आहे.

covid -19
मलिकांची एवढी क्षमता नाही, हे घाणेरडं राजकारण ठाकरे आणि शरद पवारांचं: किरीट सोमय्या

दरम्यान, या बैठकीत पंतप्रधान मोदी हे देशातील ४० जिल्हाधिकारी आणि ११ मु्ख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. सध्याच्या घडीली बाजारांमध्ये वाढणारी गर्दी पाहता देशात पुन्हा एकदा कोविड-१९ चे निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामध्ये सोशल डिसटन्स आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरला सुमारे ५ कोटी कोविड लसींचा साठा होता. आजच्या तारखेला तो १३ कोटीपेक्षा अधिक साठा राज्यांकडे पडून आहे. याहीपेक्षा जास्तीचा आकडा अनेक रुग्णालयांत पडून आहे. यामुळे लसींच्या साठ्याचा आकडा १५ कोटीवर पोचला आहे. यातून राज्य लसीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

covid -19
'नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झालाय'

दोन मोठ्या राज्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार, शेवटच्या टप्प्यातील लसीकरण करणे कठीण होत आहे. कारण ज्या नागरिकांनी १० महिन्यापूर्वी लस घेतलेली नाही, हे तेच लोक आहेत, जे या लस न घेतलेल्या आकडेवारीत आहेत. सरकारसमोर हेच मोठे आव्हान आहे, तात्काळ यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करावे लागणार आहे. यामुळे येत्या २ नोव्हेंबरपासून लसीकरणात मागे असणाऱ्या जिल्ह्यात जाऊन लसीकरण अभियान राबवणार आहे. केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत देशातील ९४ कोटी वयस्क लोकसंख्येच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com