ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ते अर्णब गोस्वामींची पाकिस्तानपर्यंत चर्चा; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

टीम ईसकाळ
Monday, 18 January 2021

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली असून निकाल हाती येऊ लागले आहे.विदेशात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून निकाल हाती येऊ लागले आहे. प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी लव्ह जिहाद प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तांडव सीरिजवरुन देशात वाद निर्माण होताना दिसत आहे. विदेशात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 

पुणे : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत असून, अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : सोमवारी सोन्याच्या दरांमध्ये (Gold prices Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटीज एक्सेंजमध्ये (MCX) आज सकाळी सोने फेब्रुवारीच्या फ्यूचर ट्रेड 40 रुपयांच्या घसरणीसह 48,685.00 रुपयांवर आले आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड काढण्याची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना असलेला आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी हा मार्ग वापरायचा ठरवला आहे. सविस्तर वाचा

मुंबई : पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी बोरीवली येथील नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी स्वयंसेवी संस्थेच्या साह्याने सुसज्ज उपचार केंद्र... सविस्तर वाचा

इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. सविस्तर वाचा

मुंबई: श्वास घेण्यास त्रास होणे हे कोरोना संसर्गाच्या अनेक लक्षणांपैकी एक प्रमुख लक्षण मानले जाते. हे थेट फुफ्फुसांशी संबंधित आहे. कोरोना व्यतिरिक्त... सविस्तर वाचा 

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या तीनवेळा खासदार राहिलेल्या शताब्दी रॉय यांना बंगाल राज्य पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या नाट्यमय घटनांनंतर तृणमूल काँग्रेसकडून ही घोषणा करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे कालच्या दिवशी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. सविस्तर वाचा 

सोलापूर : मद्यपान करणाऱ्यांना तुर्तास लस टोचली जाणार नाही. मात्र, लसीकरणापूर्वी दोन महिने आणि लसीकरणानंतर दोन महिन्यांपर्यंत मद्यपींनी मद्य प्राशन करु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : फेसबुकच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सऍपने जेव्हा नव्या प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सविस्तर वाचा 

ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय आला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांत आटोपला. सविस्तर वाचा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top 10 news latest news Corona Vaccination Farmers Protest nasiruddinshah arnab goswami corona