esakal | निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीतील लोकांना औषधी आणि उपचार मोफतमध्ये दिले जात असल्याची आणि कोरोना लस सर्वांना मोफतमध्ये देण्याचे जाहीर केले होते

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- दिल्ली सरकारनंतर आता पश्चिम बंगालनेही राज्यात मोफतमध्ये कोरोना लस दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना मोफतमध्ये लस देण्याचे वचन दिलं आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफतमध्ये लस देण्यासाठी ममता सरकार योजना बनवत आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरण अभियान सुरु केले जाणार आहे. 

World Hindi Diwas: महाराष्ट्रात भरलं होतं पहिलं जागतिक हिंदी संमेलन; जाणून घ्या...

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीतील लोकांना औषधी आणि उपचार मोफतमध्ये दिले जात असल्याची आणि कोरोना लस सर्वांना मोफतमध्ये देण्याचे जाहीर केले होते. राज्य सरकार कोरोना लस मोफत देण्याची घोषणा तेव्हा करत आहे जेव्हा केंद्र सरकारने देशातील जनतेला मोफतमध्ये लस देण्याची घोषणा केली आहे.  

जगभरात सुरु असणाऱ्या ड्राय रनचा आढावा घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी देशातील जनतेला कोरोना लस दिली जाणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी असंही स्पष्ट केलं होतं की, सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याची गरज पडणार नाही. केवळ काही लोकसंख्येला लस दिली जाईल, त्यामुळे कोरोनाप्रति लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होईल. कोरोना विषाणूची साखळी तुटेल इतक्या लोकांनाच लस दिली जाईल.

प्रायव्हसीबाबत WhatsApp ला तगडा पर्याय; जगातील श्रीमंत व्यक्तीने सुचवलेल्या...

देशात लवकरच लसीकरणाची मोहिम हाती घेतली जाणार आहे. असे असले तरी सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस अगोदर मिळेल. अंदाजानुसार देशात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फंटलाईन वर्कर्सं आहेत. प्रत्यक्ष लसीकरणामध्ये कोणता अडथळ येऊ नये, यासाठी देशात लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. यात देशातील विविध शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेकच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. त्याआधीच लशीला मंजुरी मिळाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. 
 

loading image