esakal | 'कोरोना व्हायरस हे 100 वर्षांतील सर्वांत वाईट संकट'

बोलून बातमी शोधा

RBI_Governor_Das

शतकातील सर्वात वाईट संकट

- अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचे प्राधान्य ​

'कोरोना व्हायरस हे 100 वर्षांतील सर्वांत वाईट संकट'
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, कोरोना व्हायरसचे संकट हे गेल्या 100 वर्षांतील सर्वांत वाईट संकट आहे. यामध्ये आरोग्य आणि आर्थिक संकट धोक्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नवी दिल्ली येथे आयोजित 'सातव्या एसबीआय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या कार्यक्रमात व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये दास बोलत होते. ते म्हणाले, कोरोना हे वाईट संकट आहे. परंतु, अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचे प्राधान्य आहे. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहे. कोरोनामुळे आरोग्य आणि आर्थिक संकट धोक्यात येत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आता या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न सुरु आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले, कोरोना व्हायरसचे संकट मोठे आहे. यामध्ये अनेकांचे मृत्यू झाला. अनेकांच्या जीवनावर याचा मोठा परिणामही झाला. ग्राहकांना दिलासा मिळावा, विविध प्रयत्न केले जात आहेत. फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत आम्ही 115 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घसरणीतून सावरण्यासाठी त्यादृष्टीने विविध प्रकारची पावले उचलण्यात आली आहेत.

शतकातील सर्वात वाईट संकट

कोरोना व्हायरस हे अर्थव्यवस्थेवरील शतकातील सर्वांत वाईट संकट आहे. या संकटाचा परिणाम नोकरीपासून दैनंदिन कामांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात झाला आहे. याशिवाय ग्लोबल चेन व्हॅल्यू आणि जगभरातील कामगारांवरही याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आहे.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा