esakal | लसीचं KYC व्हेरिफिकेशन करता येणार; कोविन पोर्टलवर सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

लसीचं KYC व्हेरिफिकेशन करता येणार; कोविन पोर्टलवर सुविधा

लसीचं KYC व्हेरिफिकेशन करता येणार; कोविन पोर्टलवर सुविधा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : ‘कोविन ॲप’ वा पोर्टलवर आता संस्था वा कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्याने वा ग्राहकाने लस घेतली आहे किंवा नाही, याचे केवायसी व्हेरिफिकेशन स्टेटस जाणून घेऊ शकणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही सुविधा नव्याने उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा: Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा

कोविडविरोधी लसीकरण मोहीम सुरू केल्यापासून आतापर्यंत ७२ कोटींपेक्षा जास्त डोस वितरित करण्यात आले आहेत. लसीकरण केलेल्या व्यक्तीला लसीकरणाबाबत खात्री देणारे प्रमाणपत्र कोविनच्या माध्यमातून दिली जाते. हे प्रमाणपत्र स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर डिजिटल कायमस्वरूपी ठेवता येते. हे प्रमाणपत्र डीजी-लॉकर मध्ये देखील उपलब्ध होते. मॉल, कार्यालय संकुल, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र द्यावे लागते. ते डिजिटल त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपातही उपलब्ध होऊ शकते. परंतु काही प्रसंगी हे प्रमाणपत्र पूर्ण पाहण्याची गरज नसते, तर समोरील व्यक्तीने लस घेतली आहे किंवा नाही एवढीच खरी माहिती जाणून घेणे आवश्यक असते. रोजगार देणारी संस्था, कंपनी, रेल्वेतील जागेसाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही, याची माहिती आवश्‍यक असते. विशेषत: माहीत करून घेणे रेल्वेला आवश्यक असते.

हेही वाचा: ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'

संबंधितांच्या मोबाईल क्रमांकाने पडताळणी

एखादी कंपनी असो की रेल्वे वा विमान यांना आता त्यांच्या ग्राहकांनी लसीकरण केले नी नाही, याची माहिती कोविनद्वारे मिळू शकेल. यासाठी संबंधित व्यक्तीला केवायसी व्हीसी या सुविधेमध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर त्यांना ओटीपी पाठविला जाईल. तो टाकल्यानंतर संबंधित व्यक्तीचे लसीकरण झाले अथवा नाही किंवा लसीचा एक डोस घेतला आहे, याबद्दल संदेश पाठविला जाईल. त्या व्यक्तीला तो संबंधित कंपनी वा संस्थेला तत्काळ पाठविता येईल.

loading image
go to top