क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने घातला गोंधळ

Cricket Player mohammed shamis wife haseen jahan detained by UP police
Cricket Player mohammed shamis wife haseen jahan detained by UP police

लखनौ : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आणी त्याची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद थांबला नाही. हसीन जहा ही मोहम्मद शमीच्या घरी गेल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरवात केल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

मोहम्मद शमी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करत असून, सध्या इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे तो प्रतिनिधित्व करत आहे. मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना थोपवणाऱया शमीला मात्र वैयक्तिक आयुष्यात पत्नी हसीन जहांशी झगडावे लागत आहे. हसीन जहा रविवारी (ता. 28) शमीच्या घरी म्हणजे तिच्या सासरी गेली. त्यावेळी सासरच्यांनी तिला घराबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, हसीन जहांने घरात घुसुन स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. त्यानंतर सासू आणि दिर यांच्याशी तिचा वाद सुरू झाला आणि शेजारीही त्यांच्या घराजवळ जमू लागले. यानंतर शमीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी हसीनला घरातून ताब्यात घेतले असून, अमरोहाच्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या नजरकैदेत ठेवले आहे. मानसिक स्वास्थ जाणून घेण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यावेळी शमीच्या पत्नीने पोलिस ठाण्यात पवन कुमार पुत्र इंद्रपाल सिंग आणि अरमान पुत्र मुन्नन यांच्याविरोधात कलम 151 नुसार तक्रार दाखल केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हसीना म्हणाली, 'मोहम्मद शमीच्या ओळखीच्या आणि पैशाच्या बळावर पोलिस मला त्रास देत आहेत. रात्री 12 वाजता मला घरून उचलले असून मला काहीही खायला दिलेले नाही. पोलिसांनी काहीही दोष नसताना मला ताब्यात घेतले आहे. माझी लहान मुलगी आणि आयाला ताब्यात घेतले आहे, त्यांनाही उपाशी ठेवण्यात आले आहे.'

दरम्यान, हसीन जहाने तिचा पती मोहम्मद शमीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार आणि जीवे मारण्याच्या धमकीसह अनेक गंभीर आरोप केले होते. शमी मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचाही खळबळजनक आरोप हसीनने केला होता. मात्र बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणात शमीला क्लीनचिट देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com