सगळे गप्प असताना अनिल कुंबळे कुस्तीपटूंसाठी मैदानात! म्हणाला... | Wrestlers Protest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestlers Protest

Wrestlers Protest : सगळे गप्प असताना अनिल कुंबळे कुस्तीपटूंसाठी मैदानात! म्हणाला...

Wrestlers Protest : भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे कुस्तीपटूंसाठी मैदानात उतरला आहे. अनिल कुंबळेने ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटूंसोबत दिल्ली पोलिसांच्या वागणुकीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवायला हवा, असे तो म्हणाला.

अनिल कुंबळे म्हणाले, “28 मे रोजी आपल्या कुस्तीपटूंसोबत झालेली कारवाई पाहून खूप वाईट वाटले. चांगल्या संवादाने कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते. मी लवकरात लवकर ही समस्या सुटेल, अशी आशा करतो."

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात गेल्या जवळपास महिनाभरापासून कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे.

रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. यासोबतच दिल्ली पोलिसांनी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते.

टॅग्स :anil kumble